पुणे : वडगाव शेरी येथील एकता भाटी या महिलेच्या खुनाची सुपारी देणा-या महिलेला पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी दिल्लीतून ताब्यात घेतले असून तिला अटक करण्यात आली आहे.संध्या पुरी (रा. दिल्ली) असे तिचे नाव आहे.एकता भाटी यांचे पती ब्रिजेश भाटी यांच्याशी संध्या पुरी यांचा आर्थिक व्यवहारावरुन वाद होता़ अनेकांचे पैसे द्यायचे असल्याने ब्रिजेश भाटी सुमारे अडीच वर्षापूर्वी दिल्लीहून पुण्यात कुटुंबासह रहायला आला़ त्यानंतर या महिलेने त्याचा शोध घेतला. पुण्यात येऊन पुरी याने भाटी याची भेट घेतली होती़ गेल्या तीन ते चार वर्षापासून ब्रिजेशचे तिच्याबरोबर संबंध होते़ ब्रिजेशने तिच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसेही घेतले होते़ दुसरीकडे तो तिच्याशी लग्न ही करत नव्हता आणि पैसेही देत नव्हता़ त्यामुळे तिने दिल्लीत त्याच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली होती़ याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाटीयाला अटकही केली होती. तो सुमारे दीड महिने कोठडीत होता. पुरी त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करीत असे़ पैसे दिले नाही तर तुझे खानदान संपवून टाकेन, अशी धमकीही ती देत होती़ तो आपल्याला मिळावा व आपल्या तरी काटा दूर व्हावा, यासाठी तिने शिवलाल व मुकेश राव या पिता पुत्रांना ब्रिजेशची पत्नी एकता हिच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानंतर शिवलाल व मुकेश राव यांनी बुधवारी २१ नोव्हेंबरला सकाळी पावणेआठ वाजता त्यांन घरात शिरुन एकता वर गोळीबार करुन तिचा खुन केला़ त्यानंतर ते पळून गेले होते. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक पुणे रेल्वे स्टेशनवर तपासणी करत होते़ त्यावेळी शिवलाल याने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले होते़ पळून जाणाºया दोघा पिता पुत्रांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यावर पुरी हिने त्यांना सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाची टीम तातडीने दिल्लीला रवाना झाली होती. या पथकाने तिचा शोध घेऊन तिला सोमवारी रात्री पुण्यात आणले. पुरी हिला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,
एकता भाटी यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेला दिल्लीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:03 PM