विकास शहा
सांगली - जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादावादीतून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना आज, रविवार दिवाळीदिनीच घडली. त्यामध्ये महेश राजेंद्र मोरे (वय २७) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, मयत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे, मुळगावं हालोंडी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) सध्या रा. कापरी (ता. शिराळा ) हे आईसह लहानपनापासून आजोळी मामा व आजीकडे कापरी ता.शिराळा येथे रहात होते . तर वडिल गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. मयत महेश व अविनाश दोघांच्या मध्ये पैसे देव घेवी वरून वारंवार भांडणे होत होती. तर दोघे ही सेट्रिंगवर कामावर जात होते. मयत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे काढत असे याच कारणावरून रविवार दिनांक १२ रोजी रात्री अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण लागले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले, यामध्ये मयत महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला मयत महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.महेश याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील करत आहेत.