बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने एका विवाहित महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे महिलेचे वैवाहिक जीवन पूर्णपणे संपुष्टात आले. या कारणामुळे यापूर्वी दोनदा मुलीचे लग्न मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनीअटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेचे लग्न नवादा जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित झाले होते. तेव्हापासून तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर जमुई पोलिस आणि सायबर सेलने याप्रकरणी तपास सुरू केला, तेव्हा आरोपीचे नाव रोहित चौधरी असल्याचे समोर आले, त्याला नवादा येथून अटक करण्यात आली.
Maharashtra New DGP : राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे बॉस, रजनीश सेठ यांची नियुक्ती
घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले
फेक फेसबुक आयडी बनवून फोटो शेअर केलाया प्रकरणावर डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्याचे काही फोटो मॉर्फ केले गेले आणि एडिट केले गेले. नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी रोहित चौधरी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीला लग्न मोडायचे होते. एवढेच नाही तर पीडितेच्या नावाने फेक फेसबुक आयडी बनवून तो सतत फोटो शेअर करत होता.आरोपीला अटक करून कारागृहात रवानगीआरोपी रोहित चौधरीविरुद्ध गुन्हा क्रमांक-161/21, कलम-341/323/354/504/506/34 भादंवि आणि 66 सीआयटी कायदा-2000 दाखल करण्यात आला आहे. मात्र नवा संसार सुरु होण्याआधीच मोडल्यामुळे मुलीची रडून अवस्था वाईट झाली आहे.