नांदेड - जिल्हा पोलीस दलातील 185 पदासाठी 2 जानेवारी पासून शारीरिक क्षमता चाचणीला सुरवात झाली आहे. त्यात शनिवारी मैदानावर आलेल्या एका उमेदवाराजवल उत्तेजक औषधी घेण्यासाठी वापरण्यात येणारे सिरीxज आणि लिक्विडची बॉटल आढळून आली. या उमेदवाराला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस दलातील 155 पोलीस शिपाई आणि 33 चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दररोज 700 ते 1200 उमेदवारांना मैदानी चाचणी साठी बोलविण्यात येत आहे. 14 फेब्रुवारी पर्यंत ही मैदानी चाचणी सुरू राहणार आहे. त्यामुळे मैदानात उत्कृष्ट प्रदर्शन दाखविण्यासाठी उमेदवार विविध हातखंडे वापरत आहेत, पोलीस दलानेही या मैदानी चाचणी दरम्यान कुणी उत्तेजक औषधी घेतल्या स त्याला अपात्र ठरविण्याचा इशारा दिला होता. त्यात शनिवारी भरतीसाठी आलेल्या पालघर जिल्ह्यातील एका उमेदवाराची संशयावरून झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे रिकामे सिरीज आणि लिक्विड ची बॉटल आढळून आली, लगेच त्याला वजीराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भडारवर यांनी दिली