जळगाव - शहरातील मोहाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या योगेश प्रकाश जावरे वय २४ रा. तिवारीनगर, संभाजीनगर या सिव्हिल इंजिनीअर तरुणाचा शनिवारी सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.योगेश हा सिव्हिल इंजिनिअर होता. १३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खासगी काम आटोपुन दुचाकीने (एम.एच.१९ ४०५०) योगेश घराकडे परतत असतांना मोहाडी रस्तावरील नयनतारा गेस्ट हाऊससमोर अचानकपणे चुकीच्या बाजूने वाहन आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरुन अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्याच्या मित्रांसह कुटुंबियांनी तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मेंदुला जबर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशची आई बहीण भावासह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दुपारी शनिवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. योगेशच्या पश्चात वडील प्रकाश बाबुलाल जावरे, आई भारती , भाऊ हर्षल , बहीण स्मिता असा परिवार आहे. प्रकाश जावरे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारक म्हणून नोकरीला आहेत. बहिण स्मिताचे एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे तर भाऊ हर्षलही शिक्षण घेत आहे. अपघाताच्या रुपाने योगेशवर अचानकपणे काळाने झडप घातल्याने तिवारीनगरसह मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल