मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊस असलेल्या यश राज फिल्म्सच्या (YRF) अडचणीत वाढ होऊ शकते. कारण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यश राज फिल्म्सविरोधात गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता या कलाकारांचे १०० कोटी हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीने (आयपीआरएस) हा गुन्हा दाखल केला आहे.
अनधिकृत पद्धतीने इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीच्या (आयपीआरएस) सदस्यांची म्युझिक रॉयल्टी म्हणून सुमारे १०० कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी यश राज फिल्म्सविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे. आयपीआरएस हि संस्था गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांचे प्रतिनिधित्व करते. दाखल तक्रारीनुसार यशराज फिल्म्सने कलाकारांसोबत बोगस करार करून त्यावर सह्या घेण्यात आल्या आणि याची रॉयल्टी देखील जबरदस्तीने बेकायदेशीर पद्धतीने घेत आहे.
यश राज फिल्म्सचे संचालक उदय चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांचे या तक्रारीत नाव असून आर्थिक गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४०९, ३४ आणि कॉपीराईट्स ऍक्टयशराज फिल्म्सचे संचालक उदय चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांचे या तक्रारीत नाव असून आर्थिक गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४०९, ३४ आणि कॉपीराईट्स अॅक्ट १९५७ मधील कलम १८, १९, ३०, ६३अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उदय आणि आदित्य चोप्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.