नवी दिल्ली - आज सायंकाळी भारतीय उच्चायोगाचे अधिकारी भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जाधव यांच्यासमवेत होणाऱ्या या भेटीत भारतीय उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांसोबत वकीलही उपस्थित राहू शकतात. कुलभूषण जाधव यांना कोणत्याही अटीशिवाय कौन्सुलर ऍक्सेस देण्यास भारताने आज पाकिस्तानला (पाकिस्तान) सांगितले होते. या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा शोध घेत असल्याचे गेल्या आठवड्यात भारताने म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांच्यासाठी दुसर्या कौन्सुलर ऍक्सेस देण्याची भारताने केलेली मागणी पाकिस्तानने मान्य केली आहे.
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या जाधवच्या बाबतीत भारताने कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानकडून कौन्सुलर ऍक्सेसची मागणी केली होती. आता पाकिस्तानात भारतीय दूतावासाच्या 2 अधिकाऱ्यांना जाधव यांच्याकडे पोहोचण्याची मुभा देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) पुनर्विचार याचिका दाखल करण्यापूर्वी भारताने पाकिस्तानकडे ही मागणी केली होती. जरी जाधव यांना एकट्यास भेटण्याची मागणी पाकिस्तानने फेटाळली असली तरी २ अधिकाऱ्यांना जाधवपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली आहे.कौन्सुलर ऍक्सेसची भेटण्याची वेळदुपारी साडेचार वाजता (पाक वेळ संध्याकाळी ४ वाजता) कौन्सुलर ऍक्सेसची वेळ देण्यात आली आहे. जाधव ज्या ठिकाणी तुरुंगात आहेत त्या जागेला तुरूंग घोषित करण्यात आले आहे. आता जाधव यांच्याकडून ६० दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. स्थानिक नियमांनुसार, ६० दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करण्यास परवानगी आहे.
पाक परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी म्हणालया की, जाधव यांना पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांकडे कौन्सुलर एक्सेस प्रकरणाची माहिती दिली जाईल. त्या म्हणाल्या की, आम्हाला आशा आहे जाधव प्रकरणावर भारत पाकिस्तानला सहकार्य करेल. कुलभूषण जाधव यांना दुसर्या वेळी कौन्सुलर ऍक्सेसला परवानगी देण्याबाबत भारतीय उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयात (एमओएफए) दक्षिण आशिया महासंचालकांशी भेट घेतली. तथापि, जाधव यांच्याशी एकट्यास भेटण्यासह अन्य अनेक मागण्या पाकिस्तानने मान्य केल्या नाहीत.पाकिस्तानची लबाडीअलीकडेच पाकिस्तानने असा दावा केला होता की, लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानचा बुरखा फाटला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची परवानगी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं
निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
ताई मला वाचव! हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...
हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल