प्रेयसीला वाढदिवसाचा केक भरवायला तिच्या घरात रात्रीच्या अंधारात शिरलेल्या तरुणाला तिच्या घरच्यांनी मारहाण करून ठार केले आहे. बिहारच्या पाटना शहरातील पनसुही पछियारी टोला भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक्स बॉयफ्रेंडने तिच्या घरच्यांना ही खबर दिली होती.
दिलीप कुमार असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री त्याला रंगेहाथ पकडून तरुणीच्या घरच्यांनी लोखंडी सळ्या गरम करून चटके दिले. तसेच डोके तसेच त्याच्या पूर्ण शरीरावर लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली होती.
पोलिसांनी प्रेयसीच्या घरी जाऊन त्याला सोडविले, परंतू त्याची प्रकृती नाजूक झाली होती. यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु करताच त्याचा मृत्यू झाला. दिलीपच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रेयसीच्या घरातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दिलीपच्या भाचीचा वाढदिवस होता. त्याची पार्टी झाल्यानंतर पार्टीतील केक प्रेयसीला भरविण्यासाठी तो प्रेयसीच्या घरात गेला होता. प्रेयसीनेच फोनवर त्याच्याकडे हट्ट धरला होता. दिलीप दोन मित्रांसोबत तिथे चोरून गेला. तिच्या घरात चोरून प्रवेश करत असताना त्याच भागात राहत असलेल्या तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडने त्याला पाहिले. दिलीप आत घुसताच एक्स बॉयफ्रेंडने तरुणीच्या कुटुंबीयांना फोन करून याची माहिती दिली. तसेच काही ग्रामस्थांनाही कळविले. यामुळे या लोकांनी दिलीपला पकडले व मारहाण केली.