शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:35 PM

आयुक्तांची कारवाई : तो व्हीडीओ शहरातील हॉटेलमधीलच

ठळक मुद्दे दहिवडे हे परमीट रुम व बियरबारची तपासणी करण्यासाठी गेले असता तेथे दप्तरावर नोंदी घेत असतानाच बियरचे घोट रिचवत होते. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे.

जळगाव : परमीट रुममधील कागदोपत्री रेकॉर्डची तपासणी करताना मद्याचे घोट रिचविणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक नरेंद्र दहिवडे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केली असून त्याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्राप्त झाले आहेत. या कारवाईबाबत उपायुक्त ए.एन.ओहोळ व अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दुजोरा दिला.

दहिवडे हे परमीट रुम व बियरबारची तपासणी करण्यासाठी गेले असता तेथे दप्तरावर नोंदी घेत असतानाच बियरचे घोट रिचवत होते. याबाबतचा व्हीडीओ दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ सोमवारी जळगावात आले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. जिल्ह्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अहवाल तयार करुन तो उपायुक्तांकडे सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे हा अहवाल पाठविला. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

व्हीडीओ २०१८ मधीलनरेंद्र दहिवडे यांचा ऑन ड्युटी मद्य प्राशन करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडीओ हा २०१८ या वर्षाचा असून तो शहरातील महामार्गावरील शिवकॉलनीजवळील एका हॉटेलमधला असल्याचे चौकशी निष्पन्न झाल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, याआधी नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स व आर.के.वाईन्समध्ये लॉकडाऊन काळातील मद्यविक्री प्रकरणातही दहिवडे यांच्यावर आरोप झाले होते. नशिराबाद येथील गोदामात तर जिल्हाधिकाऱ्यांनीच दहिवडे यांना फटकारले होते.

 

टॅग्स :suspensionनिलंबनJalgaonजळगावExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग