शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

खळबळजनक! महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 1:30 PM

अंधेरी लोखंडवाला परिसरातील घटना; दोन हल्लेखोर

ठळक मुद्देत्वचा तज्ज्ञ महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला क्लिनिक तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यात अडथळा

मुंबई -  त्वचा तज्ज्ञ महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी अंधेरीत घडला. या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.नसरीन खान (वय ४०) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे अंधेरीतील ओशिवरा मार्केट परिसरात क्लिनिक आहे. खान या रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार करत होत्या. त्यादरम्यान हेल्मेट घातलेले दोन इसम त्यांच्या क्लिनिकमध्ये दाखल झाले.त्यांनी क्लिनिकमधील कर्मचाऱ्याला आवाज देत खान यांना बोलावण्यास सांगितले. काही वेळाने खान बाहेर आल्या. तेव्हा त्या अनोळखी इसमाने त्यांच्या मानेवर तलवार ठेवली तर दुसऱ्याने चॉपर आणि चाकूने त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. त्यानंतर ते मोटारसायकलवर बसून पसार झाले डॉक्टरने आरडाओरडा केला. मात्र, गजबजलेल्या परिसरातही हल्लेखोरांना पकडण्याची हिम्मत कोणीच केली नाही. या घटनेनंतर खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी खान यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी 

यासंदर्भात अधिक माहिती देताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्लिनिक तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यात येत असून दोन्ही हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यात अडथळा येत आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPoliceपोलिस