मुंबई - अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील मालपा डोंगरी क्रमांक ३ येथील एका विहिरीत आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृतदेह सापडला. त्यामुळे परिसरात एकचखळबळ उडाली होती. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. हा मृतदेह प्रशांत प्रभाकर मालवणकर (२८) या पुरुषाची असल्याची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाचे जवान देखील दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत तरंगणारा मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृतदेह कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी ही आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबत तपास करत आहेत.