एकदा माफ करा! पुढचे सहा महीने मोबाइलला हात लावणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 20:48 IST2020-02-06T20:46:36+5:302020-02-06T20:48:55+5:30
कोर्टाने त्याला माफ केले. परंतु 20 हजार रुपये दंड ठोठावला.

एकदा माफ करा! पुढचे सहा महीने मोबाइलला हात लावणार नाही
चंदीगड - तरुणांना स्मार्ट फोन वापरण्याचा आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची आजकाल खूप आवड आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्याची चढाओढ लागलेली असते. मात्र, काहीवेळा चुकीच्या पोस्ट काही लोकांच्या महागात पडतात. एका युवकालाही ट्विटरवर एका महिलेविरूद्ध अशोभनीय पोस्ट करणं अंगलट आलं आहे. हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले. स्वतः ला वाईट प्रकारे या प्रकरणात अडकलेले पाहून नंतर तरुण कोर्टात म्हणाला की, मला माफ करा, मी सहा महिने स्मार्टफोनला स्पर्श करणार नाही. यानंतर कोर्टाने त्याला माफ केले. परंतु 20 हजार रुपये दंड ठोठावला.
ट्विटरवर या महिलेविरूद्ध चुकीची टिप्पणी पोस्ट करण्यासंदर्भात होते प्रकरण
या युवकाला हायकोर्टात माफी मागत हमीपत्र दाखल करावे लागले. पुढचे सहा महिने तो स्मार्टफोनचा वापरही करणार नाही अशी हमी त्या युवकाला द्यावी लागली. या कारवाईनंतर कोर्टाने 20 हजार रुपये दंड ठोठावून सशर्त माफी मागितली. हे प्रकरण करनाल येथील एका युवकाच्याबाबतीत घडले आहे. महिलेचा पाठलाग करून धमकी दिल्याप्रकरणी १९ ऑक्टोबर २०१८ साली एका महिलेने करनाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अटक टाळण्यासाठी या तरूणाने हायकोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीला हायकोर्टाने या प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाने याचिकाकर्त्यास सांगितले होते की, तो या चौकशीत पोलिसांना सहकार्य करेल आणि कोणतेही असे कृत्य करणार नाही ज्यामुळे फिर्यादी पक्षास अपाय होईल.
हायकोर्टाच्या आदेशानुसार, आरोपी युवक पोलीस तपासात सहकार्य करत होता. परंतु, त्याने सोशल मीडियावर फिर्यादी महिलेविरूद्ध आक्षेपार्ह अशोभनीय पोस्ट केली. त्यानंतर महिलेने याबाबत हायकोर्टात तक्रार केली आणि आरोपी तरुणाचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली.