मीरा रोड : लहान मुलांचे पोर्नोग्राफी व्हिडीओ पुरवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चालवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. एका ग्रुपमधील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण पाच तरुणांना अटक केली आहे. त्यांचे पाच मोबाइल जप्त केले आहेत. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दोन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देशाच्या विविध भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थी व नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरु णांची संख्या मोठी आहे. दोन्ही ग्रुपच्या अॅडमिनचा शोध सुरू असून त्यापैकी एक तामिळनाडूचा असल्याचे समजते. असे आणखी ग्रुप असल्याची माहिती असून हे रॅकेट आंतरराज्य स्तरावर चालत असल्याने त्याचा तपास सुरू आहे.बिबी बॅड बॉइज या ग्रुपमध्ये बंदी असलेले लहान मुलांचे पोर्नोग्राफी व्हिडीओ, छायाचित्रे टाकली जात असल्याचे व तेथून ते अन्यत्र व्हायरल होत असल्याचे त्या ग्रुपमध्ये चुकून जोडल्या गेलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार पोलिसांना कळवला. सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत स्वत: तपास सुरू केला. तपासासाठी पोलिसांची सात पथके नेमली. मुंबई, नाशिक, ठाणे, वसई-विरार आदी भागांत जाऊन या पथकांनी तपास सुरू केला. या ग्रुपमध्ये देशातील २०० सदस्य आहेत. १३० लहान मुलांचे पोर्न व्हिडीओ टाकले होते. डार्कवेब नावाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावरील वा अन्य मार्गाने लहान मुलांचे पोर्नोग्राफी व्हिडीओ मिळवून ते नियमित ग्रुपमध्ये टाकले जात होते. अशा प्रकारचे असे आणखी ग्रुपही चालवले जात असल्याची माहिती असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोर्नाेग्राफीचा व्हॉट्सअॅप ग्रुप उघड; पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:43 AM