शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

लग्नात आलेल्या गिफ्टचा स्फोट, नवरदेवाचा हात आणि डोळ्याला गंभीर दुखापत; पत्नीच्या एक्स बॉयफ्रेंडवर संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 1:50 PM

या घटनेत वराचा डोळा पूर्णपणे डॅमेज झाला असून त्याचे मनगटही हातापासून वेगळे झाले आहे. याशिवाय, या स्फोटामुळे त्याच्या शरिरालाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे. 

सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न म्हटले की कुटुंबातील सर्वच लोक आनंदाच्या भरात असतात.  मात्र गुजरातमधील एका लग्न समारंभात आलेले गिफ्ट नवरदेवाच्या कुटुंबीयांसाठी दुःखाचा डोंगर ठरले आहे. लग्नात मिळालेले हे गिफ्ट उघडल्यानंतर मोठा स्फोट झाला. यामुळे नवरदेवाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पुतण्याही जखमी झाला आहे.

ही घटना नवसारी जिल्ह्यातील वंसदा तालुक्यात मीठांबरी येथे घडली. येथे नुकताच एक लग्नसमारंभ पार पडला होता. यावेळी आलेल्या पाहुण्यांनी नवरदेव आणि नवरीला मोठ्या प्रमाणावर गिफ्ट्स दिले होते. लग्नानंतर नवविवाहित लतेश गावित लग्नात मिळालेले हे गिफ्ट्स बघत होता. याच वेळी लग्नात मिळालेल्या एका टेडी बेअरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात वरासह त्याचा तीन वर्षांचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डोळ्याला दुखापत - या घटनेत वराचा डोळा पूर्णपणे डॅमेज झाला असून त्याचे मनगटही हातापासून वेगळे झाले आहे. याशिवाय, या स्फोटामुळे त्याच्या शरिरालाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे. 

एक्स बॉयफ्रेंडवर संशय - या घटनेसंदर्भात वराच्या सासऱ्यांनी आपल्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेडवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, त्यांची मुलगी सलमा हिचे लग्न लतेशसोबत झाले होते. सलमाच्या मोठ्या बहिणीचा एक्स बॉयफ्रेंड राजू धनसुख पटेलने एका आशा वर्करच्या हातून टेडी बेअरसारखे इलेक्ट्रॉनिक गिफ्ट लग्नात पाठवले होते. याशिवाय पोलिसांनाही राजूवरच संशय आहे. राजूचे सलमासोबतही प्रेमसंबंध होते आणि सूडाच्या भावनेतून त्याने ही घटना घडवून आणली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासही सुरू केला आहे.

टॅग्स :marriageलग्नBlastस्फोटPoliceपोलिस