शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक; अनेकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 5:58 AM

Online instent loan: झटपट कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमधील सर्व डाटा हॅक होत असल्याने मोबाईलधारकाची सर्व माहिती समोरील व्यक्तीकडे जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग व इतर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत.

- अरुण वाघमोडेलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: ‘झटपट ऑनलाईन कर्ज मिळाले पण डोक्याला मोठा ताप झालाय’ असा पश्चाताप करण्याची वेळ सध्या अनेकांवर आली आहे. कर्ज वसुलीसाठी कर्जदारालाच नव्हे तर त्याच्या नातेवाईकांनाही रात्रंदिवस फोन अन् मेसेज करून या ऑनलाईन सावकारांनी बेजार केले आहे. विशेष म्हणजे हे वसुली पंटर शिवीगाळ करत धमक्याही देत असल्याने अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

अवघ्या पाच मिनिटात मिळेल कर्ज अशी जाहिरातबाजी केली जात आहे. केवळ आधारकार्ड क्रमांक देऊन पाच ते सात हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. कर्ज घेण्यासाठी ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना मोबाईलमधील सर्व डाटा ॲप्लिकेशनचालकांकडे जातो. कर्जपरतफेडीची मुदत अवघी पाच ते दहा दिवसाची असते आणि त्याला व्याज २५ ते ४० टक्क्यांपर्यंत असते. 

मुदतीत पैसे दिले नाही तर कर्जदारासह त्याच्या मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना रात्री-अपरात्री फोन केले जातात. मेसेज पाठविले जातात. अशा फोन कॉल्समुळे बहुतांश जण गोंधळून जातात.

असे ॲप्लिकेशन्स घातकn झटपट कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमधील सर्व डाटा हॅक होत असल्याने मोबाईलधारकाची सर्व माहिती समोरील व्यक्तीकडे जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग व इतर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत.

ऑनलाईन घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात भरमसाट रकमेची मागणी करून कर्जदाराला धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. कर्जदार स्वत: कर्ज घेत असल्याने हा प्रकार सायबर ॲक्टमध्ये येत नाही, मात्र नागरिकांनी अशा आमिषाला बळी पडू नये. यामध्ये मोबाईल डाटा हॅक होत असल्याने आणखी फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन