पुणे : गिफ्ट म्हणून आणलेले सोन्याचे दागिने कस्टम अधिका-याकडून सोडविण्याच्या बहाण्याने फेसबुक फ्रेंडने एका व्यवसायिकाला ४७ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँलिथिया स्मिथ (अमेरिका), दिल्लीतर कस्टम अधिकारी आणि चार मोबाइल धारकांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी हरणीश हिंमतलाल राघनपुरिया (वय ५९, रा. शंकरशेठ रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरणीश यांची जुलै महिण्यात एका अमेरिकन महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. या महिलेने तिला भारतामध्ये जमिनीत गुंतवणुक करायची असल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांच्यामध्ये नियमीत चॅटींग होत होते. मैत्री वाढल्यानंतर फिर्यादीने त्याच्यासाठी सोन्याचे दागिने भेट स्वरुपात घेऊन दिल्ली येथे आल्याचे सांगितले. यानंतर कॉल करून दिल्ली येथे कस्टर अधिका-यांनी पकडले असून सोने सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. तसेच दुस-या एका मोबाईलधारकाने कस्टम अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्याकडे सोने सोडवण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानूसार संबंधित महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने आरोपी महिलेने सांगितलेल्या बँक खात्यावर तब्बल ४७ लाख ७ हजार ८०० रुपये वर्ग केले. यानंतर संबंधित महिलेने फोन बंद केल्याने फसवणूक झाल्याचे फियार्दीच्या लक्षात आले. त्यानूसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम. आर. पंडीत करत आहेत.
फेसबुक फ्रेंडने ४७ लाखांना गंडवले; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 4:58 PM
गिफ्ट म्हणून आणलेले सोन्याचे दागिने कस्टम अधिका-याकडून सोडविण्याच्या बहाण्याने फेसबुक फ्रेंडने एका व्यवसायिकाला ४७ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देस्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल