राजस्थानमधील भिलवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनिमूनच्या दिवशी कौमार्य चाचणीत (Virginity Test) फेल झाल्यामुळे एका नववधूला सासरच्या लोकांनी मारहाण करून पळवून लावले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरु केला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पीडितेच्या आईने सांगितले की, ६ महिन्यांपूर्वी तिच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने बलात्कार केला होता. यासोबतच तिने आपल्या मुलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती, या भीतीने ती गप्प राहिली. त्यानंतर आम्ही ११ मे रोजी मुलीचे लग्न लावून तिला सासरच्या घरी पाठवले. पण सासरच्या घरी मधुचंद्राच्या आधी तिची कौमार्य चाचणी करण्यासाठी कुकडीच्या विधी करण्यात आल्या. ज्यामध्ये ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने आपल्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. यानंतर मुलीच्या विरोधात सामाजिक पंचायत बोलावून बलात्कार पीडितेला शिक्षा देण्याची तयारी करण्यात आली. या माहितीची दखल घेत राज्य महिला आयोगाने भिलवाडा जिल्हा पोलिसांकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे.पीडितेचे म्हणणे आहे की, तिचे आई-वडील लग्नाला गेले होते. ती रात्री शौचासाठी गेली होती. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले होते. कुणाला काही सांगितल्यास दोन्ही भावांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. लग्नानंतर ती कुकडी प्रथेच्या परीक्षेत अयशस्वी ठरल्याने सासरच्यांनी तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कुकडी पद्धतीत लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहित जोडप्याला सुताचे कापड दिले जाते. कौमार्य चाचणी यासाठीच ओळखली जाते.पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतलेयाप्रकरणी भिलवाडा पोलीस अधीक्षक आदर्श सिद्धू म्हणाले की, हे एक सामाजिक दुष्प्रचार आहे. जे एनजीओ आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सामाजिक पंचायत बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरूणीने शेजाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणीही कारवाई सुरू आहे.