पुणे : बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करून त्याद्वारे बनावट जामीनदार न्यायालयापुढे उभे करून आरोपींना जामीन मिळवून देणाºया टोळीचा पर्दाफाश खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे़. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे़. त्यांच्याकडून १३ आधारकार्ड व १५ रेशनकार्ड जप्त केली आहेत़.पूनम बाळू कांबळे (वय २७, रा़ पिंपळे गुरव), तैहसिन अर्शद जहागिरदार (वय ३८, रा़ चिखली), मन्सूर महंमद नायकवडी (वय ३०, रा़ निगडी), सागर मुकुंद गायकवाड (वय २८, रा़ निगडी), संतोष रघुनाथ अहिवळे (वय ३४, रा़ पिंपरी), संजय साहेबराव ढावरे (वय ५०, रा़ निगडी), देवानंद गोपाळराव गुट्टे (वय २८, रा़ जि़ परभणी), सुनील मारुती गायकवाड (वय ४०, रा़ पिंपरी), विजय मारुती भारसकर (वय ४०, रा़ पिंपरी), अविनाश भानुदास बनसोडे (वय २८, रा़ चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व उपायुक्त बच्चनसिंग यांनी शासकीय कार्यालयात बनावट कागदपत्रांचा वापर होत आहे, अशी बनावट कागदपत्रे बनविणाºया लोकांवर कारवाई करावी, असे आदेश दिले होते़. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक माहिती गोळा करीत असताना काही जण शिवाजीनगर न्यायालयात बनावट सात-बारा उतारा, रेशनकार्ड, आधारकार्ड बनवून चोरी, जबरी चोरी, घरफोडी या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठी जामीन करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली़. त्याआधारे पोलिसांनी कामगार पुतळा येथे छापा टाकून १० जणांना पकडले़. या आरोपींना आतापर्यंत प्रत्येकी ३ ते ४ जणांना जामीन मिळवून दिल्याची चौकशीत पुढे आले आहे़. अधिक तपास एन. व्ही. महाडिक करीत आहेत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, किशोर, तनपुरे, कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसाहेब कोंढरे, प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, पांडुरंग वांजळे, प्रमोद मगर, हनुमंत गायकवाड, सुनील चिखले, विजय गुरव, उदय काळभोर, महेश कदम, मनोज शिंदे, सचिन कोकरे, मंगेश पवार, अमोल पिलाने, संदीप साबळे, प्रवीण पडवळ, नारायण बनकर, रूपाली कर्णवर यांनी ही कामगिरी केली आहे़. ...........
काही वकिलांचाही सहभाग असल्याची शक्यता टोळीतील काही जण आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क करत असे़ त्यांना आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा तयार करून घेत़. त्यानंतर या जामीनदारांना न्यायालयात उभे करुन ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक करीत असत़. यामध्ये प्रामुख्याने जो जामीनदार असे त्याच्या आधारकार्डावर फोटो असे़ बाकी नाव, पत्ता हे बनावट असे़ त्यानंतर त्याच नावाने रेशन कार्ड तयार करीत असत़. त्यानंतर ते काही वकिलांना सांगून ही आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे जामीनदाराला व कागदपत्रे घेऊन जात़. ..........ही कागदपत्रे बनावट असल्याची माहिती या वकिलांना असतानाही त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे सांगण्यात आले़. या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी काही वकिलांची नावे सांगितली असून त्यांचे व्हिजिटिंग कार्डही पोलिसांकडे दिली आहेत़.......
वकिलांवर केव्हा होणार कारवाई?पुणे : एजंटामार्फत बनावट कागदपत्रे तयार करुन बनावट जामीनदार आहेत, हे माहिती असतानाही काही ठराविक वकील न्यायालयाची दिशाभूल करून आरोपींचा जामीन करून देत असल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या कारवाईत पुढे आले आहे़. एजंट व जामीनदार अशा १० जणांना अटक केली आहे़. मात्र, ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे़ हे जामीनदार व कागदपत्रे खोटी असल्याची माहिती असतानाही ते न्यायाधीशांची दिशाभूल करत होते. त्यांच्यावर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़. खंडणीविरोधी पथकाने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट जामीनदार म्हणून उभे राहणाºयांना अटक केली आहे़. त्यातील काही जण एजंट म्हणून काम करत होते़. वकील, एजंट आणि जामीनदार अशी त्यांची एक साखळी असल्याचे तपासात पुढे येत आहे़. आरोपीच्या नातेवाईकांनी वकिलांशी संपर्क साधल्यावर ते पैसे घेऊन एजंटला दोन जामीनदार आणायला सांगत़. .......बनावट जामीनदाराचे दर ठरलेलेअशा प्रकरणात जामीनदार २ हजार रुपये, सातबारा उतारा तयार करणे, आधारकार्ड तयार करणे, रेशनकार्ड तयार करणे या साठी प्रत्येकी ५०० रुपये घेतले जात असत़ आपल्याकडे आलेला जामीनदार व त्याची मिळालेली कागदपत्रे ही बनावट आहेत, याची माहिती असतानाही हे ठराविक वकील त्यांना न्यायालयासमोर उभे करून ते खरे आहेत, हे सांगून न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले आहे़ या वकिलांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे़