शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

बनावट प्रमाणपत्रधारक डॉक्‍टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 7:40 PM

मूळचा सांगलीतील रहिवासी असलेल्या पाटील याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठळक मुद्देसांगलीतील रहिवासी असलेल्या धीरज पाटील याने 2012 मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण रशियातून पूर्ण केले.सादर केलेल्या एनबीई परीक्षेची गुणपत्रिका आणखी एका विद्यार्थ्यानेही दिल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. न्यायालयांनी ते फेटाळले आणि त्यानंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले.

मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (महाराष्ट्र मेडिकल काउंसिल - एमएमसी) बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली धीरज पाटील (29) या डॉक्‍टरला आग्रीपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मूळचा सांगलीतील रहिवासी असलेल्या पाटील याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सांगलीतील रहिवासी असलेल्या धीरज पाटील याने 2012 मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण रशियातून पूर्ण केले. असे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेची (एमसीआय) विशेष परीक्षा (एनबीई) उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. पाटील याने एमएमसीला 2012 ते 2016 या काळात एमसीआय प्रमाणपत्र, एनबीई गुणपत्रिका व इतर कागदपत्रे सादर केली. त्याने सादर केलेल्या एनबीई परीक्षेची गुणपत्रिका आणखी एका विद्यार्थ्यानेही दिल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. दरम्यान पाटीलने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर एमएमसीने आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी पाटील याने सांगलीतील स्थानिक न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. न्यायालयांनी ते फेटाळले आणि त्यानंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तो मंगळवारी आग्रीपाडा पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पाटील दिल्लीत दिलेल्या एनबीई परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. त्याने एमसीआयला सादर केलेले प्रमाणपत्र कुठून मिळविले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आमदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरPoliceपोलिस