नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) आयुक्तालयाने मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी १०.२६ कोटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच मेसर्स अल-मारवाह ट्रेडर्सच्या मालकास अटक केली. या फर्मचा ६० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या बोगस पावत्याच्या जोरावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा करून घेणे, त्याच्या वापर करण्यात सहभाग होता. त्यामुळे सरकारी तिजोरीत ६० कोटींची फसवणूक झाली.अँटी इव्हेशन, सीजीएसटी, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने फर्मची चौकशी केली. मालकाच्या जबाबानुसार, ही फर्म फेरस, ऍल्युमिनियम, तांबे आणि इतर धातूंच्या भंगाराच्या व्यापाराशी संबंधित आहे. तथापि, तपासात असे उघड झाले आहे की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट ITC प्राप्त करून मंजूर करून घेतला.आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा २०१७ च्या कलम ६९ (१) नुसार सदर कायद्याच्या कलम १३२ (१) (ब) आणि (क) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि बेलापूर येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्कचे आयुक्त प्रभात कुमार यांनी सांगितले.हा कारवाईचा बडगा CGST, मुंबई झोनने फसवणूक करणारे आणि कर चुकवणार्यांविरुद्ध सुरू केलेल्या अँटी-इव्हेशन मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने ४५० कोटींहून अधिक कर चुकवेगिरी उघडकीस आणली आहे. तसेच २० कोटी जप्त केले आणि नुकतेच 12 जणांना अटक केली.
आतापर्यंत ५० जणांना अटकनवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयने पाच महिन्यात आतापर्यंत ४५० कोटी रुपयांची करचोरी उघडकीस आणली असून २० कोटी रुपयांची वसुली केली आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे जीएसटीच्या मुंबई विभागाने या कालावधीत ६२५ करचोरी प्रकरणांचा तपास करून ५५०० कोटी रुपयांची करचोरी पकडली आहे. आणि ६३० कोटी रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे.