प्रयागराज - शहरात राहणाऱ्या एका युवा इंजिनिअरचा अलीकडेच जॉब गेला, नवीन जॉबसाठी तो सातत्याने वेगवेगळ्या पोर्टलवर अर्ज करत आहे. जॉबचा शोध संपतच नव्हता. त्याचवेळी एकेदिवशी व्हॉट्सअपवर मेसेज येतो. त्यात Concentrix नावाच्या कंपनीत व्हेकेंसी आहे. त्यासाठी तुमचा CV शॉर्टलिस्ट केला आहे. त्याच्या २ दिवसांनीच युवकाचे ३.५ लाख लुटण्यात आले.
याचरितीने यूपीतील व्यक्तीचे ४० लाख लुटण्यात आले. त्याच्याकडे इतकेही पैसे नव्हते. मित्रांकडून उधारी घेऊन त्याने पैसै ट्रान्सफर केले होते. परंतु का आणि कशासाठी? ही कहानी केवल UP मध्ये राहणाऱ्या २ युवकांची नाही. तर देशातील विविध भागात राहणाऱ्या १०० हून अधिक लोकांची आहे. जे वर्क फ्रॉम होम स्कॅमचे शिकार झालेत. १०० लोकांच्या खात्यातून ५० हजार ते ५० लाखांपर्यंत रक्कम लुटण्यात आली आहे. त्यातील काही लोक आता कर्जात बुडाले आहेत. तर काही रस्त्यावर आलेत. कारण आयुष्यभराची कमाई संपली आहे.
काही पीडितांनी बँकेचे व्यवहार शेअर केलेत. एका युवकाने याला बळी पडून ४० लाख गमावले. युवकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या पीडित लोकांमध्ये प्रत्येकाचा समावेश आहे. काही जण नोकरीच्या शोधात आहेत तर काही जॉब किंवा छोटे बिझनेस करतायेत. बहुतांश लोक सुशिक्षित आहेत. परंतु यात अधिक जॉब गेलेले आणि जे जॉबचा शोध घेतायेत त्यांना लुटण्यात आले आहे. १०० लोकांनी पोलीस तक्रार दिली आहे. परंतु पोलिसांना या टोळीचा शोध लावणे आव्हानात्मक बनले आहे.
कसा होता हा घोटाळा? सुरुवातीला ही टोळी पीडितांना मेसेज करते. वर्क फ्रॉम होम करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता असं सांगितले जाते. मेसेज वाचला तर तो एकदम जॉब ऑफरसारखाच असतो. हा जॉब वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आहे. ब्लॉगर्स, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब रिच वाढण्यासाठी प्रत्येक दिवशी काही अकाऊंस फॉलो करणे, व्हिडिओ लाईक्स करणे हे काम असते. पहिले काही दिवस टोळी पीडितांच्या खात्यावर १ हजार ते १० हजार रुपयेही पाठवतात. जेणेकरून समोरच्याचा विश्वास संपादन होईल.
अकाऊंट, व्हिडिओ लाईक्स आणि फॉलो करण्याचं काम अशारितीने सांगितले जाते जेणेकरून समोरच्याला ते पटेल. प्रोफेशनल पद्धतीने सर्व मेसेज ड्राफ्ट केले जातात. दरदिवशी २० अकाऊंट फॉलो आणि पोस्ट लाईक्स करायला सांगतात. अनेकदा बनावट आयडी कार्डही पाठवले जाते. जेणेकरून लोक सहजपणे जाळ्यात सापडतील.