राजगुरुनगर : लांडगा आला रे आला... ही गोष्ट आपण लहानपणी शाळेत असताना प्रत्येकाने ऐकली असेल, मात्र सध्या या गोष्टीचा प्रत्यय खेड तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांना येत आहे. गेल्या १५ दिवसांपासुन चोरटे आल्याच्या मोठ्या अफवा परिसरात पसरत आहे. चोरटे या गावातून त्या गावात गेले. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत.,त्या चोरट्यांनी अंगाला तेल लावल्याचे संदेश व्हाट्सअपवर फिरत आहेत. त्यामुळे चोरटे आल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरवून भीती निर्माण करण्याचे काम सुरु असून नागरिक, पोलीस रात्र-रात्र जागून पहारा देत आहे.
होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी ,खरपुडी ,रेटवडी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून चोरटे आल्याच्या अफवा आहेत. रात्री आठ साडेआठ वाजता चोरटे आल्याचे फोन पोलिसांना येत आहेत .पोलीस घटनास्थळी दाखल होतात .पोलीस घटनास्थळी जाताच चोरटे पळून गेल्याचे नागरिकांनकडून सांगितले जाते. या दिशेने गेले, त्या दिशेने गेल्याचे पोलिसांना सांगितले जाते. पोलीस पाठलाग करता मात्र कोणी आढळून येत नाही. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत गावागावात लांऊडस्पीकरवरुन चोरटे आल्याचे नागरिकांना सांगितले जात आहेत. त्यामुळे महिला व लहान मुले या भीतीने भयभयीत झाली आहे. धारदार हत्यारे घेऊन ५ ते १० जणांचे टोळके आले नागरिकांनी पकडू नये म्हणून त्यांनी अंगाला तेल लावले आहे. त्याच्याकडे धारदार शस्त्रे आहे. गावातील लाईट बंद करून चोऱ्या करत आहे, अशी अफवा गेल्या १५ दिवसांपासुन सोशल मीडियावर अफवा येत आहे. सोशल मीडियावर संदेश आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नागरिक रात्र रात्र जागून काढत आहे. गेल्या पंधरा दिवसात अशा प्रकारे चोरी झाल्याच्या खेड पोलिस ठाण्यात फक्त दोन गुन्हे दाखल आहेत.
खेड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी म्हणाले, खेड तालुक्याच्या पुर्व भागात थिटेवाडी , टाकळकरवाडी (ता खेड ) या परिसरात चोरीच्या घटना घडली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश येत असल्याने नागरिकही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चोरीच्या अफवा जास्त प्रमाणात पसरतात तेव्हा प्रकार खरा की खोटा याची खात्री करून मगच असे संदेश पुढे पाठवा, अपवा करणारे असे मेसेज येतात तेव्हा जनतेमध्ये घबराट निर्माण होते. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्या संशयितांवर सायबर सेलची कडक नजर असून, अशा व्यक्तींवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल.
......................................................................कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास गावातील पोलिस पाटील किंवा पोलिस ठाण्यात संपर्क करावा, चोरटे आल्याच्या केवळ अफवा आहेत. रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते नागरिकांना माझा आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवले आहे .चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून यावर विश्वास ठेवू नये.- आत्माराम डुंबरे (पोलिस पाटील, दावडी )