शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज! तोतया पोलिसांना डी एन नगर पोलिसांकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:29 PM

याप्रकरणी सदर व्यक्तीने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर भामट्या पोलिसांना खऱ्या पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून गजाआड करण्यात यश मिळवले.

मुंबई : 'पुढे लफडा झाला आहे आणि लफडा करणारा तुझ्याच सारखा दिसतो, असे म्हणत दोघांनी एकाचा रस्ता अडवला. त्याची झडती घेतली आणि खिशातले पैसे घेऊन पसार झाले. याप्रकरणी सदर व्यक्तीने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर भामट्या पोलिसांना खऱ्या पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून गजाआड करण्यात यश मिळवले.

डी एन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री ११.५० च्या  सुमारास फिर्यादी हे अंधेरी पश्चिमच्या जमातखाना समोरून पायी त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका लाल रंगाच्या मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम आले. ज्यांनी फिर्यादीला त्यांच्याजवळ बोलवून ते दोघे पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर आगे लपडा हुआ है और लपडा करने वाला इंसान आपके जैसा दिखता है असे बोलून फिर्यादीकडील असलेल्या सामानाची झडती घेऊ लागले. इतकेच नव्हे तर त्या मधून ७ हजार रुपये त्यांनी हातचलाखीने काढून पळ काढला. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२०, १७० व ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. डी एन नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे ) वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, रतन पाटील, मंगेश चव्हाण, पोलीस शिपाई मुकेश धर्माधिकारी, बजरंग भोसले, रणजीत महाडिक , सुमित पोळ व राहुल चौधरीया त्यांच्या पथकाने घटनास्थळीचे ३० ते ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात एक संशयित लाल रंगाची मोटर सायकल व दोन अनोळखी इसम त्यांना दिसले. तर आरोपी हे मेघवाडीच्या ईदगा मैदान परिसरातील आहेत अशी माहिती पठाण यांना मिळाली. अखेर मोहम्मद युसूफ सय्यद उर्फ मुन्नू (४३) आणि याकुब अब्दुल कादिर खान उर्फ आलम (३९) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ज्यांच्यावर पवई पोलिसातही गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून चोरलेले सात हजार आणि गुन्हा साठी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आल्याचे कुरडे यांनी सांगितले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग लोणकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई