गाझियाबाद: कोरोना साथीच्या काळात अफवांचा बाजारही तेजीत सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे. अशीच एक घटना गाझियाबादमध्ये समोर आली आहे. मोहम्मद दानिश नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे शेअर केलं गेलं आहे की, एक मुलगी तिची पिगी बॅक फोडून पीएम केअर फंडला ५१०० रुपये दान केले होते. त्या मुलीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. जेव्हा ही माहिती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मुलगी पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आले आणि कोरोनाविरूद्धची लढाई जिंकल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.
यानंतर पोलिसांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सांगितले की, पीएम केअरला दान करणारी मुलगी तंदुरुस्त असून तिला अवंतिका हॉस्पिटलमधून सोडण्यात येत आहे. तिच्या वडिलांनी याची माहिती दिली आहे, अशा अफवा पसरवू नका. बनावट पोस्टवर कायदेशीर कारवाई करण्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी ट्विटरवर चुकीची माहिती पाठविली असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यामुळे संबंधित ट्विटर हॅण्डल वापरणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'तुमच्यावर चुकीचे ट्विट केल्याबद्दल कारवाई केली जात आहे,' असे गाझियाबाद पोलिसांनी स्वतःच ट्विटवर उत्तर त्या ट्विटवर दिले होते. ज्या मुलीचे नाव त्याने पोस्ट केले होते, त्या मुलीच्या वडिलांनी देखील मी तुझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहे, असे म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत लोकांनी पीएम केअर फंडमध्ये सहभाग वाढविला होता. सर्व दिग्गजांबरोबरच सर्वसामान्य जनता आणि मुलांनीही यात आपले समर्थन दिले. याच भागात गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या अवंतिकाने तिचा पिगी बॅक तोडली आणि पीएम केअर फंडला ५१०० रुपये दान केले. त्यावेळी सोशल मीडियावरही अवंतिकाचे कौतुक झाले होते.