शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

तुम्हालाही अनोळखी व्हिडिओ कॉल्स येतात, तर व्हा सावध! अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 1:52 PM

Cyber Crime : यापूर्वी केवळ सायबर गुन्हेगारांद्वारे हॅकिंग केले जात होते, मात्र आता त्यातही ब्लॅकमेलिंगचे  (Blackmailing) गुन्हे वाढत आहेत.

नवी दिल्ली :  जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला तर काळजी घेण्याची खूप गरज आहे. जर तुम्ही या प्रकरणात अडकलात तर तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. या प्रकारचे सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) सामान्यतः यूपी, हरियाणातील लोकांना त्यांच्या न्यूड कॉल स्कॅममध्ये अडकवतात. यापूर्वी केवळ सायबर गुन्हेगारांद्वारे हॅकिंग केले जात होते, मात्र आता त्यातही ब्लॅकमेलिंगचे (Blackmailing) गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून न्यूड कॉलचा घोटाळा करत आहेत.

न्यूड कॉल स्कॅम म्हणजे काय?न्यूड कॉल स्कॅममध्ये गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून अज्ञात नंबरवरून व्हिडिओ कॉल करेल. तुम्ही हा फोन उचलल्यास, गुन्हेगार तुमचा फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करेल आणि नंतर तो मॉर्फ करेल. गुन्हेगार तुमच्या फोटोचे नग्न फोटो किंवा व्हिडीओमध्ये रूपांतर करेल आणि ते व्हायरल करण्याची धमकी देईल. या धमक्यांमध्ये तो तुमच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करेल. अनेक लोक नग्न फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप घाबरतात आणि बदनामी टाळण्यासाठी ते गुन्हेगारांचे बळी ठरतात. त्याचबरोबर ब्लॅकमेलरला आपल्या मागणीनुसार पैसे देण्यास भाग पाडले जाते. आपली इज्जत वाचवण्यासाठी लोक गुन्हेगारांना पैसे देतात.

सापळ्यात कसे अडकता?तुम्हाला फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावरून मेसेज किंवा कॉल येईल. जर तुम्ही कॉल उचलला तर एक स्त्री तुमच्याशी बोलू लागेल. बोलत असताना तुमची मैत्री होईल, त्यानंतर ती तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल. तुम्ही देखील या व्हिडिओ कॉलमध्ये सामील व्हाल आणि या दरम्यान तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल. या व्हिडीओ कॉलसमोर तुम्ही एका सेकंदासाठीही आलात तर समोरची व्यक्ती तुमचा फोटो काढेल. यानंतर, तो तुमचा फोटो मॉर्फ करून आणि तुमचा व्हिडिओ तयार करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करणारे फार कमी लोक आहेत. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे तुमच्यासोबतही घडू नये, त्यामुळे अनोळखी व्हिडिओ कॉलपासून सावध राहा आणि सुरक्षित राहा.

न्यूड कॉल स्कॅम कसा टाळायचा?जर तुम्हाला न्यूड कॉल स्कॅम टाळायचा असेल तर पहिल्यांदा सोशल साइटवरील सर्व अकाऊंटमध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा मित्र बनवू नका. ज्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, त्याबद्दल तुम्ही कसून चौकशी करावी. जर तुम्ही त्याला ओळखत नसाल तर त्याला तुमचा मित्र बनवू नका. तरीही, तुम्ही नकळत त्यांना तुमचा मित्र बनवलात, त   री त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करू नका. चुकूनही त्यांचा व्हिडीओ तुम्हाला मिळाला तरी कॅमेरासमोर तुमचा चेहरा आणू नका, याद्वारे तुम्ही हा न्यूड कॉल स्कॅम टाळू शकता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtechnologyतंत्रज्ञान