राजगुरूनगर : टाकळकरवाडी येथील पोपट मारुती टाकळकर (वय ५५ वर्षे,रा. टाकळकरवाडी, ता.खेड ) हे घरातील सर्व सदस्यासह काल (दि. ८ )रोजी सायंकाळी ७.४५ वाजता सुमारास गणेश मंडळाच्या आरतीसाठी शंभर फूट अंतरावरती गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा फक्त ओढून घेतला होता. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून फक्त पंधरा मिनिटांत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ६० हजार रुपये तसेच घरातील अँगलला अडकवलेले शर्टातील खिशातील रोख २ हजार चारशे-रुपये असा एकुण सुमारे तीन लाख ६२ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती झाल्यानंतर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत खेडपोलिस ठाण्यात पोपट मारुती टाकळकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश ढोकले करीत आहे..आठ दिवसापूर्वी ही टाकळकरवाडी परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या थिटेवाडी गावात. घराचा कडी कोयंडा तोडून कोयत्याचा धाक दाखवून सुमारे एक लाख ९२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले असल्याची घटना होती.. त्यामुळे या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचे चित्र आहे तसेच सोशल मीडिया वरती अफवाचे पेव सुटले .
घरातले गेले आरतीला आणि चोरट्यांनी लुटले अवघ्या १५ मिनिटांत घर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:44 PM