चेन्नई - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयालक्ष्मी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मानसिक तणावामधून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असून,सुदैवाने तिला वाचवण्यात यश आल्याचे वृत्त आहे. विजयालक्ष्मी हिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप त्रास देण्यात येत असल्याने आपण तणावात असल्याचे म्हटले होते. दरम्यान, रविवारी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मी ब्लड प्रेशरच्या काही औषधांचे सेवन केले असून, त्यामुळे आता रक्तदाब कमी होत जाऊन माझा मृत्यू होईल, असा दावा केला होता. मात्र तिला वाचवण्यात आले असून, सध्या चेन्नईमधील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मी गेल्या चार महिन्यांपासून सिमान आणि त्याच्या पार्टीच्या लोकांमुळे खूप तणावात आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे होताना दिसत नाही आहे. मला हरी नाडर याने प्रसारमाध्यमांमधून खूप अपमानित केले आहे. मी आता ब्लड प्रेशरच्या गोळ्यांचे सेवन केले आहे. काही वेळाने माझा ब्लड प्रेशर कमी होऊन माझा मृ्त्यू होईल.
दरम्यान, माझा मृत्यू हा लोकांसाठी उदारहरण ठरावा, तसेच सीमान आणि हरी नाडरसारख्या लोकांना सोडण्यात येऊ नये, असे आवाहन तिने चाहत्यांना केले. तसेच आपले मानसिक शोषण केल्याप्रकरणी या लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
दरम्यान, विजयालक्ष्मीवर सध्या चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीमान हा तमिळ नॅशनलिस्ट पक्षाचा नेता आहे. तर हरी नाडर हा सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान