नवी दिल्ली - हरियाणा फरीदाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलीनेच आपल्य़ा जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्राईम ब्रांचने या ब्लाईंड मर्डर केसचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणामुळे मुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रासोबत राहायचं होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र आई यामुळे खूश नव्हती. ती प्रेमप्रकरणामुळे नाराज झाली होती. म्हणून मुलीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
अल्पवयीन मुलीने रात्री आईला लिंबू सरबत दिलं. त्यामध्ये तिने झोपेच्या काही गोळ्या टाकल्या. त्यानंतर तिने आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला. मित्राने हत्या कशी करायची हे सांगितलं. याप्रकरणी पोलिसांना मुलीसह दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून त्याचे आणि अल्पवयीने मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या आईचा या नात्याला विरोध होता. यामुळेच या दोघांनी तिला मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी झोपेच्या गोळ्या घेऊन आला आणि मुलीने त्या सरबतमध्ये टाकून आपल्या आईला दिल्या.
आरोपीने रात्री व्हिडीओ कॉल केला आणि मुलीला उशीने तिच्या आईचं तोंड दाबायला सांगितलं. तसेच ओढणीच्या मदतीने गळा आवळण्याचाही सल्ला दिला. मुलीने तशाच प्रकारे आपल्या आईची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 55 किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलात एका 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. झाडावर लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे.