उमरेड : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक २० आर जमिनीचा सातबारा मला देण्यात यावा, अशी मागणी करीत एका शेतकऱ्याने उमरेड एसडीओच्या दालनातच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सागर काशिनाथ मंदरे रा. मकरधोकडा, ता. उमरेड असे शेतकऱ्याचे नाव असून त्यास उमरेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.