ठळक मुद्देहिंमत अजबसिंग पाटील (४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी ते गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेले आणि तिथेच त्यांनी गळफास घेतला.
एरंडोल जि. जळगाव : एका शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना कढोली ता.एरंडोल येथे बुधवारी सकाळी घडली ९ वाजता घडली.हिंमत अजबसिंग पाटील (४७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी ते गुरांना चारापाणी देण्यासाठी गोठ्यात गेले आणि तिथेच त्यांनी गळफास घेतला.त्यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.