ठाणे : सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी पितापुत्राला मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी विभागाने मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी पितापुत्राला अटक करण्यात आली असून २२ कोटी रुपयांच्या जीएसटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे सीजीएसटी विभागाने कारवाई करत दोन व्यावसायिकांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघे हे नात्याने पितापुत्र आहेत. या दोघांच्या मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटी मध्ये नोंदणीकृत आहेत.११.८० आणि १०.२३ कोटी रु. ची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनुकमे घेउन आणि पास करण्यात गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट आईटीसी बनावट संस्थांकडून मिळवत होत्या आणि ते या इतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. दोघांना सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1)(b) &(c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. तसेच त्यांना मंगळवारी मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लानेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती ठाणे सीजीएसटी विभागाकडून देण्यात आली.
प्रामाणिक करदात्यांशी अस्वास्थ्य स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि सरकारी तिजोरीला योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट ITC नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी CGST मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत विभाग फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे. - राजन चौधरी, आयुक्त सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालय