नेर (यवतमाळ) : गावातील युवकाला बहिणीशी का बोलला, असा जाब विचारला असता त्या युवकाने बहिणीबाबत अपशब्द वापरून भावाचा अपमान केला. यावरून संतापलेल्या भावाने पित्याला सोबत घेऊन मध्यरात्री शेतात गेलेल्या युवकाचा खून केला. ही थरारक घटना नेर तालुक्यातील आजनी येथे बुधवारी रात्री घडली.अवधुत सुभाष इंगळे (३०) असे मृताचे नाव आहे. रामदास पवार, ऋतिक रामदास पवार असे आरोपी पिता-पुत्राचे नाव आहे. आरोपी व मृत दोघेही आजनी येथे राहतात. बुधवारी दुपारी अवधुत हा ऋतिकला त्याच्या बहिणीसोबत बोलताना दिसला. यावरून ऋतिकने अवधुतला जाब विचारला. त्यावेळी अवधुतने ऋतिकच्या बहिणीबाबत अपशब्द वापरून त्याचा अपमान केला. या अपमानाचा संताप ऋतिकच्या डोक्यात होता. बुधवारी रात्री त्याने थेट अवधुतचे घर गाठले. मात्र अवधुत घरी नव्हता. काहीवेळ वाट पाहिली, तरीही तो घरी आला नाही. संतापाच्या भरात ऋतिक व त्याचे वडील रामदास दोघेही थेट अवधुतच्या शेतात पोहोचले. तेथे त्यांनी काही बोलण्याअगोदरच अवधुतवर चाकू व दगडाने हल्ला केला. यात अवधुतचा जागीच मृत्यू झाला.अवधुत घरी परतलाच नाही. यामुळे कुटुंबीय व शेजारच्यांनी त्याचा शेतात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी ही खुनाची घटना उघड झाली. नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. प्राथमिक चौकशी केली असता पवार पिता-पुत्रांनी हा खून केल्याचा अंदाज ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी वर्तविला. नेर तालुक्यात एका महिन्यात खुनाची दुसरी घटना आहे. या थरारक घटनेने खळबळ निर्माण झाली आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात