शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संतापजनक! अवघ्या ५० रुपयांसाठी पित्यानेच केला दहा वर्षीय मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 7:18 PM

Murder Case : कळव्यातील संतापजनक घटना, निर्दयी पित्याला अटक

ठाणे: अवघे पन्नास रुपये चोरल्यामुळे आपल्याच करण या दहा वर्षीय मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा पित्यानेच खून केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पिता संदीप उर्फ बबलू प्रजापती याला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी शुक्रवारी दिली. त्याला 5 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे एक आठवडयांपूर्वीही कळव्यातच एका महिलेने तिच्या पाच महिन्यांच्या मुलाचाही भीतीपोटी खून केला होता.

कळव्यातील वाघोबानगर, ठाकुरपाडा झोपडपट्टी येथे संदीप उर्फ बबलू प्रजापती हा पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. २९ डिसेंबर रोजी दुपारी त्याचा मुलगा करण याने घरातून पन्नास रुपये चोरले होते. ही बाब समजल्यानंतर त्याने मुलास जबर मारहाण केली. याच अमानुष मारहाणीत त्याच्या दोन्ही हाताला, पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच डोक्याचीही कवटी फुटल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतरही या निर्दयी पित्याने त्याला घरातच एका चादरीत गुंडाळून ठेवले. नंतर त्यास घरात कोंडून दरवाजा बंद ठेवला. हा प्रकार २९ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. परिसरातील नागरिकांनी या घटनेची खबर दुसऱ्या दिवशी कळवा पोलिसांना दिली. १२ तासांहून अधिक काळ मुलगा घरात बेशुद्ध अवस्थेत बंद असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, सुदेश आजगावकर, जितेंद्र कुंवर आणि उपनिरीक्षक किरण बघडाणो आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा घरातच या मुलाला चादरीत गुंडाळल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले असता, तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्राने मित्राला चाकूने भोसकले

 

मुलाच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळल्या. त्याच्या डोक्याची कवटीही फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भाऊ करण याने घरातून पन्नास रुपये चोरल्यामुळे पप्पानी त्यास मारहाण करून मारून टाकले, अशी माहिती करणच्या लहान बहिणीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर कळवा, वाघोबानगर भागात फिरणा:या आरोपी संदीप याला अटक केली. संदीप हा मद्यपी असून तो त्याच्या पत्नी आणि मुलांनाही मारहाण करीत असल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक