शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

"मी पोलिसांना घाबरत नाही!" असं म्हणणाऱ्या सासऱ्याने सुनेचे दोन्ही हात तलवारीने कापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 9:41 PM

The father-in-law cut off both of daughter in law's hands :या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सासऱ्याला अटक केली. त्याचवेळी जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला भोपाळला पाठवण्यात आले.

विदिशा - मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एका सासऱ्याने आपल्या सुनेवर तलवारीने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही सुनेचे मनगट कापून लटकत होते. अय भयानक घटनेनंतर सासरे घटनास्थळी हजर राहून 'मी पोलिसांना घाबरत नाही' असं बोलत राहिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सासऱ्याला अटक केली. त्याचवेळी जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला भोपाळला पाठवण्यात आले.आरोपी सासरा मंदिराचा पुजारीमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. आरोपी सासरा कैलाश नारायण चतुर्वेदी (80 वर्षे) हे विदिशा किल्ल्यातील मंदिराचे पुजारी आहेत. काही दिवसांपूर्वी सून सीमा हिच्यासोबत सासऱ्याचा ओट्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सासरच्या मंडळींना सुरुवातीपासूनच सुनेचा त्रास होता, कारण लग्नानंतरही सीमा अभ्यास आणि नोकरी करत असे. त्यामुळे कैलास नारायण रागावत असायचे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद व्हायचे.सून घरात पूजा करत असताना सासरच्यांनी मागून हल्ला केलासून सीमा ही घरी पुजाआर्चा करत असताना मागून आलेल्या कैलास नारायण चतुर्वेदी याने तिच्या डोक्यात वार केले. सून सीमा हिने बचावात तलवार रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही मनगट पूर्णपणे कापले गेले आणि लटकू लागले. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला लोकांचा जमाव जमला. सुनेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याचवेळी सीमा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला भोपाळला रेफर करण्यात आले. पोलिसांनी आरोपी कैलास नारायण चतुर्वेदीला अटक केली आहे.डॉक्टरांनी 9 तासांच्या शस्त्रक्रियेत सुनेचे हात जोडलेयेथे, भोपाळमधील एका खाजगी रुग्णालयातील 5 डॉक्टरांच्या पथकाने 9 तास चाललेल्या शस्त्रक्रियेत महिलेचे दोन्ही हात पुन्हा जोडण्यात यश मिळवले आहे. महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश