शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

छळाची हद्दच झाली! हुंड्यासाठी सासरच्यांनी विवाहितेच्या तोंडात जबदस्तीने ओतली अ‍ॅसिडची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 3:27 PM

Dowry Case : पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिस प्रभारी गजेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे की, पीडितेचे पाय जळाले आहेत, वैद्यकीय अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. आरोपींच्या शोधात छापा टाकण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील जलौन जिल्ह्यातील निमगाव हद्दीत सासरच्या मंडळींनी विवाहितेला अ‍ॅसिड पाजले. पीडित महिलेने सांगितले की, तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्याच्या मागणीवरून अ‍ॅसिड पिण्यास जबरदस्ती भाग पाडले, यामुळे ती जखमी झाली. पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तिच्या पतीसह सहा जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे, तर आरोपी घराला कुलूप लावून पळून गेले आहेत.निमगाव पोलिस ठाण्यात पीडित रुची मिश्रा (27) हिने तक्रार देऊन सांगितले की तिचे लग्न सुनौरा येथील अनूप कुमार याच्याशी झाले आहे. तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी छळ केला, यामुळे पती अनूप कुमारसह शकुंतला देवी, मीरा देवी, ललितकुमार, गंगा देवी आणि पूजा देवीने तिला पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात अ‍ॅसिड घातले. यात ती गंभीर जखमी झाली.घटना कळल्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर माहेरच्यांनी तिला बेहजम सीएचसी दाखवले, तिथून तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सहा सासरच्यांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. तर आरोपींनी घराला कुलूप लावून पळ काढला. याप्रकरणी पोलिस प्रभारी गजेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे की, पीडितेचे पाय जळाले आहेत, वैद्यकीय अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. आरोपींच्या शोधात छापा टाकण्यात येत आहे.जेव्हा डॉक्टरांनी उलटी करायला सांगितले, तेव्हा मासाचे तुकडे बाहेर आले पीडित रुची मिश्राचा भाऊ आणि हैदराबाद ठाणे येथील जादौरा येथील रहिवासी असलेल्या नितेश मिश्रा यांनी सांगितले की, बहिणीच्या नवऱ्यासह घरातील इतर सदस्यांनी तिच्या बहिणीला जबरदस्तीने अ‍ॅसिडच पाजले नाही तर तिला जाळले, त्यामुळे पीडितेचा शरीराचा खालचा हिस्सा खूप जळाला आहे. गंभीररीत्या जळालेल्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी बहिणीला उलटी करायला सांगितली, तेव्हा अ‍ॅसिडमुळे जळल्याने मासाचे तुकडे देखील बाहेर पडले. 

भाऊ नितेश मिश्रा सांगतात की, 2 मे 2018 रोजी त्यांनी आपल्या बहिणी रुचीचे हुंड्या देऊन नीमगाव येथील सुनौरा येथे राहणार्‍या अनुप कुमारशी लग्न लावून दिले. तथापि, तो सतत हुंड्याची मागणी करीत असे. काही दिवसांपूर्वी गावातील शेजाऱ्याच्या लग्नात बराच हुंड्या पाहून एक लाख रुपयांची सोनसाखळी आणि सासू-सासऱ्यांची मागणी वाढत गेली होती, यावर ते बहिणीच्या घरी गेले आणि मुलीचे कुटुंब आणि एकमेकांशी वाटाघाटी केली आणि प्रकरण मिटवले. मात्र, दुसर्‍याच दिवशी बहिणीने व तिच्या नवऱ्यासह तिच्या सासरच्यांनी जबरदस्तीने तोंडात  अ‍ॅसिडची बाटली ओतली. माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रथम बहिणीला बेहझम सीएचसी येथे नेले, तेथून डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात रेफर केले. मंगळवारी 18 मे रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी पीडित मुलीच्याभावाचा जबाब बुधवारी जिल्हा रुग्णालयात नोंदवले आहेत. त्याने सांगितले की, तिच्या बहिणीला मारून नवरा पुन्हा लग्न करणार आहे असा त्यांचा कट आहे.  भाऊ म्हणाला की, त्याच्या बहिणीलाही दोन वर्षांची मुलगी आहे, ती त्याने आपल्याबरोबर आणली आहे.

टॅग्स :dowryहुंडाPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश