ये पापा नहीं पापी है! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 09:25 PM2022-02-06T21:25:40+5:302022-02-06T21:27:01+5:30
Rape Case : तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सागर - मध्य प्रदेशातील सागरमध्ये एका मती भ्रष्ट बापाने आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढले. ही घटना शहरातील बरायठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एका बापाने आपल्या दोन मुलींवर बलात्कार केला आहे. वडिलांच्या या दुष्कृत्याने त्रासलेल्या मुलींनी आजीला आपबीती सांगितली. यानंतर अल्पवयीन मुलींनी आजीसह पोलीस ठाणे गाठून वडिलांच्या क्रौर्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या आजीने पोलिसांना सांगितले की, माझी मोठी नात जास्त बोलू शकत नसून हातवारे करून बोलते. तिच्या हावभावावरून मला सगळं कळतं. आज सकाळी माझ्या नातवाने हातवारे करत सांगितले की, काल रात्री पापाने माझ्यासोबत जबरदस्तीने चुकीचे कृत्य केले आहे.
बाप 3-4 महिन्यांपासून बलात्कार करत आहे
त्याचवेळी आरोपी वडील 3-4 महिन्यांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुस-या नातीने सुद्धा सांगितले की, पप्पांनी 3-4 दिवसांपूर्वी माझ्यासोबत चुकीचे काम केले होते. पप्पांच्या भीतीमुळे आम्ही तुम्हाला सांगू शकलो नाही. मुलींचे सर्व म्हणणे ऐकून आजीने बरायठा पोलिस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली.
अटक आरोपीची चौकशी सुरू आहे
आजीच्या तक्रारीवरून बरायठा पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.