शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

विनापरवाना वैद्यकीय उपकरणे विकणाऱ्यांना एफडीएचा दणका

By स्नेहा मोरे | Published: August 03, 2022 7:08 PM

१२ लाखांची उपकरणे जप्त

स्नेहा मोरे, मुंबई: गुप्तवार्ता विभाग, अन्न व औषध प्रशासन, मुख्यालय, मुंबई यांचे गोपनीय  माहितीच्या आधारे  २ ऑगस्ट रोजी गुप्तवार्ता विभाग व ठाणे  कार्यालायचे क्षेत्रीय औषध निरिक्षक  यांच्या पथकाने निरजकुमार विश्वकर्मा, यांच्या मालकीच्या मे. शेलमार्क लाइफ केअर, प्रा. लि. , भारत इको विष्टा, शिळफाटा, ठाणे या इमारतीतील एका सदनिकेत पंचासह तपास- चौकशी साठी धाड टाकली.  या जागेत सिडँक लाइफ केअर बहादूरगड, हरियाणा या उत्पादकाच्या कोविड-१९, एचआयव्ही, हिपँटायटीस, सिफिलीस, मलेरिया, डेंग्यू, विषमज्वर इ . आजाराच्या नैदानिक चाचणीसाठी लागणाऱ्या रँपीड टेस्ट किट चा मोठ्या  प्रमाणावर साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

धाड टाकलेल्या जागेस औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व मेडिकल डिव्हायसेस नियम, २०१७ नुसार नैदानिक  चाचणी संच विक्रीसाठी आवश्यक  परवाना मंजूर नव्हता. सदर प्रकरणात वरील रँपिड नैदानिक चाचणी संचांची  विनापरवाना विक्री होत असल्याचे निष्पन्न झाल्याने उपलब्ध साठ्यातून प्रातिनिधीक नमुने चाचणी व विश्लेषणा साठी घेण्यात आले व उर्वरित रु. १२.४० लक्ष किमतीचा साठा औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० मधील  कलम १८ (सी) चे उल्लंघन झाल्याने  जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आवश्यक तपास करून संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई नियोजित आहे. वरील कारवाई श्री. वि. रा. रवी, शशिकांत यादव, औषध  निरीक्षक गुप्तवार्ता व श्री. अजय माहुले , औषध निरीक्षक यांनी  पार पाडली.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागMumbaiमुंबई