जळगाव : तालुक्यातील विटनेर येथे मनोज धनराज परदेशी (४०) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. मनोज यांनी कर्जबाजारीपणामुळे शेतातच विष घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज यांच्याकडे साडे चार एकर शेती असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, बँक व इतर असे एकूण तीन लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे. शेतातून दरवर्षी दरवर्षी फारसे उत्पादन येत नाही. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. दुसरीकडे कर्ज व त्यावरील व्याजाचा डोंगर वाढतच जात असल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती करणे अवघड झाले होते. कर्ज फेडण्याच्या चिंतेत कुटुंबात बऱ्याच वेळा वादविवादही होत होते. मंगळवारी मनोज हे शेतात गेले असता दोन वाजता त्यांनी विष घेतल्याचे पत्नीच्या लक्षात आले. त्यांनी मुलगा व इतर लोकांच्या मदतीने तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.मनोज परदेशी यांच्या पश्चात पत्नी शिल्पा, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी
पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी
पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...
बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न