माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:35 PM2022-07-15T21:35:28+5:302022-07-15T21:36:15+5:30

Crime News : याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Feel Sad that brings shame to humanity; Urinate after asking for water, know the whole case | माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

माणुसकीला लाज आणणारी घटना; पाणी मागितल्यावर लघवी पाजली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, जी तुम्हाला तालिबानी अत्याचाराची आठवण करून देईल. याठिकाणी दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पाणी मागितल्यावर दोन्ही तरुणांना गुंडांनी लघवी दिली. तसेच त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सदर बझार पोलीस स्टेशन हद्दीतील काकरा भागातील ही घटना आहे. येथे राहणारे इस्तेखार आणि शाबू यांचा सदर बाजार परिसरातील एकाच फार्म हाऊसवर राहणाऱ्या सरदार राजू, कुलविंदर, चिता आणि सोनू उर्फ ​​सुखदेव यांच्याशी ८ जुलै २०२२ रोजी किरकोळ वाद झाला होता. घटनेनंतर आरोपी सायंकाळीच कारमध्ये आले आणि त्यांनी दोन्ही तरुणांचे अपहरण केले. यानंतर तरुणांना निर्जनस्थळी नेण्यात आले. येथे चार आरोपींनी इस्तेखार आणि शब्बू यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला
त्याचवेळी तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले असता आरोपींनी त्यांना लघवी पिण्यास भाग पाडले. यादरम्यान आरोपींनी लघवी करतानाचा व्हिडिओही बनवला. आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Feel Sad that brings shame to humanity; Urinate after asking for water, know the whole case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.