शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Instagram वरील मैत्रिणीवर प्रेम जडलं; युवकाने प्रेमाआड येणाऱ्या बापालाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 1:55 PM

आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली.

पलवल - हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील घरौट गावात झालेल्या प्रल्हाद हत्याकांडात पोलिसांनी मुलगा पुष्पेंद्रला अटक करून १ दिवसीय पोलिस कोठडीत घेतले आहे. हत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमावरून पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यावेळी खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपीने त्याचा गुन्हा पोलिसांसमोर कबुल केला. हत्येनंतर धारदार शस्त्राने त्याने स्वत:लाही मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हाही दाखल केला आहे. 

पंजाबच्या मुलीशी करायचं होतं लग्नतपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी आरोपी पुष्पेंद्रची इन्स्टाग्रामवर पंजाबच्या लुधियाना इथं राहणाऱ्या युवतीशी मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे जाऊन प्रेमात रुपांतर झाले. या युवतीला भेटण्यासाठी युवक लुधियानाला गेला होता. लुधियानाला जाण्यासाठी त्याने कर्ज काढून पैसे खर्च केले. आरोपीने युवतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कुटुंबाला सांगितले. कुटुंबातील काही सदस्यांनी दबावाखातीर लग्नाला परवानगी दिली परंतु वडील प्रल्हाद यांनी लग्नास नकार दिला. 

हत्या करून मृतदेह कपड्यांनी झाकला आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली. मुलाची उडवाउडवीची उत्तरे पाहून वडिलांनी पोलीस ठाण्यात रिपोर्ट करू असं सांगितले. याबाबत कुठलीही तक्रार पोलिसांनी दिली नाही. या सर्व घटनांमुळे संतापलेल्या युवकाने घरातून बाहेर पडत शेताकडे गेला. तिथे झोपलेल्या बापावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कपड्याने झाकून मुलगा घरी येऊन झोपी गेला. 

प्रल्दाह यांचा शेतात खून झाल्याची बातमी स्थानिकांना कळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला त्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्या तपासात प्रल्हाद यांच्यावर मुलावर पोलिसांना संशय आला. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी