शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
2
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
4
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
5
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
6
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
7
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
8
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
9
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
10
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
11
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
12
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
13
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
14
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
15
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
16
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
17
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
18
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
19
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
20
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

महिला डॉक्टरवर तामिळनाडूमध्ये सामूहिक बलात्कार, पीडितेने सांगितली भयानक आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 9:36 PM

Female doctor gang-raped : पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, त्यानंतर तातडीने कारवाई करत सामूहिक बलात्काराच्या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाटणा : तामिळनाडूतील बिहारमधील महिला डॉक्टरसोबत एक भयानक घटना घडली आहे. वेल्लोर येथील रुग्णालयात काम करणाऱ्या बिहारमधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे ठाम विधान केले आहे. महिला डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने डॉक्टर तसेच सर्वसामान्य जनता हादरली आहे. स्मशानभूमीजवळ ऑटोचालकासह त्याच्या इतर साथीदारांनी ही घृणास्पद घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, त्यानंतर तातडीने कारवाई करत सामूहिक बलात्काराच्या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.बलात्काराच्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीनमिळालेल्या माहितीनुसार, वेल्लोरमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे म्हटले आहे. मीडिया आणि पोलिसांच्या वृत्तानुसार, बिहारमधील रहिवासी पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर दोघेही थिएटरसमोर ऑटोची वाट पाहत उभे होते. तेवढ्यात एक ऑटोचालक आला. त्या ऑटोमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 4 जण आधीच बसले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने ऑटो चालकाला हॉस्पिटलच्या दिशेने चालायला सांगितले होते, मात्र काही अंतर गेल्यावर ऑटोचालकाने रस्ता बदलला आणि ऑटोचा वेगही खूप वाढला होता.महिला डॉक्टराने ऑटो चालकाला मार्ग बदलण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री रस्ता बंद असतो त्यामुळे त्या मार्गाने जाता येत नाही. पीडित महिला डॉक्टरने सांगितले की, ड्रायव्हरने वाटेत एका स्मशानभूमीजवळ एका निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली. यानंतर चार मुले आणि ऑटोचालकाने महिला डॉक्टरचा विनयभंग सुरू केला. तिने विरोध केला असता सर्वांनी मुलीला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण केली.या भयंकर घटनेनंतर महिला डॉक्टर घाबरून बिहारमध्ये आलीमारहाण, विनयभंग करूनही हे प्रकरण थांबले नसल्याचे महिला डॉक्टरने सांगितले. हे कृत्य केल्यानंतर सर्वांनी आलटून-पालटून महिला डॉक्टरवर बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने तेथून निघून जाण्याची विनंतीही केली, मात्र आरोपीने तिचे ऐकले नाही. या भयंकर घटनेनंतर महिला डॉक्टर घाबरून बिहारमध्ये आली आहे. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाईत गुंतले असून तपासानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या सर्व आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांनी दोघांचे मोबाईल, रोख रक्कम आणि दागिने हिसकावले. पुरुष मित्राला एटीएममध्ये नेऊन बळजबरीने 40 हजारांची रक्कमही काढण्यात आली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणdoctorडॉक्टरBiharबिहारTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसArrestअटक