मध्य प्रदेशमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा (Women police officer) अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडीओ बनविण्याच्या आरोप त्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या चालकावर लावण्यात आला आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल असून भोपाळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा ड्रायव्हर फरार झाला आहे. (female police officer bathing Video Recorded by Police constable.)
भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबलविरोधात कथितरित्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढणे आणि त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कॉन्स्टेबलचे नाव भूपेंद्र सिंह असे आहे. भूपेंद्र हा महिला पोलीस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर होता.
महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले की, अंघोळ करत असताना कोणीतरी व्हिडीओ बनवत असल्याचा भास झाला. २२ सप्टेंबरची ही घटना आहे. महिला अधिकाऱ्याने बाथरुमच्या दरवाजाच्या खाली एक मोबाईल कॅमेरा पाहिला. बाहेर येताच तेथून ड्रायव्हर फरार झाला होता.
महिला अधिकाऱ्याने सांगितले की, २६ सप्टेंबरला ड्रायव्हर तिच्या घरी आला आणि त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. असे न केल्यास सोशल मीडियावर तिचा बदनाम करण्याची धमकी दिली. महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाशी संपर्क केला, यानंतर शहरातील गुन्हे शाखेत हे प्रकरण हलविण्यात आले. आरोपी सध्या फरार असून त्याने गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.