Bihar Crime News : बिहारमध्ये फारबिसगंज जिल्ह्यातील गोढीहारेमध्ये एका मजुराच्या मुलीचं लग्नाचं स्वप्न तुटलं. वरात दारात येण्याआधीच नवरीचं अपहरण करण्यात आलं. त्यामुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं. सकाळी तीन वाजेपर्यंत नवरदेवाकडील लोक नवरीची वाट बघत होते. पण अपहरणकर्त्यांनी तिला काही सोडलं नाही.
ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. वरात येणार होती. आनंदाने आम्ही लग्नाची तयारी केली होती. पण तेव्हाच गावातीलच एका तरूणाने मुलीचं अपहरण केलं.
आईने सांगितलं की, काही लोकांनी तिच्या मुलीला चहातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बाईकवरून तिला पळवून घेऊन गेले. गावातील लोक बसले होते. ते म्हणाले 24 तासात मुलीला परत करू. आम्ही वाट बघत राहिलो, पण तसं झालं नाही. नवरदेवाकडील लोकही सकाळी तीन वाजेपर्यंत नवरीची वाट बघत होते.
मुलीचे वडील संजय पासवान यांनी सांगितलं की, खूप आनंदाने मुलीचं लग्न करत होतो. पान टपरी चालवून आपलं जीवन जगत आहोत. नातेवाईकांकडून पैसे घेऊन मुलीचं लग्न करत होतो. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. नातेवाईक आणि समाजातील सगळे लोक आले होते. पण तेव्हाच मुलीचं अपहरण करण्यात आलं. गावातील सोनू कुमारवर मुलीला पळवण्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारू धंदा करतात. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.