मंगरूळपीर : जागेच्या कारणावरून उद्भवलेल्या वादात जबर मारहाण झाल्याने एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगरूळपीर तालुक्यातील जांब येथे ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.जागेच्या कारणावरून अव्हाळे आणि बोथे कुुटुंबात वाद आहेत. या वादातून ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दोन्ही गटात मारहाण झाली. यामध्ये भगवान अव्हाळे (६०) यांचा मृत्यू झाला. अमोल भगवान अव्हाळे (३५) रा. जांब यांच्या फिर्यादीनुसार ६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान आरोपी देवलाल बोथे, अमोल बोथे, नंदाताई बोथे, सुनीता मस्के, आशिष मस्के यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागेच्या वादावरून फिर्यादीचे वडील भगवान अव्हाळे यांना मारहाण केली. यामध्ये भगवान अव्हाळे यांचा मृत्यू झाला. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, १४७, १४९, ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला.याच घटनेत दुसºया गटातील देवलाल महादेव बोथे (६१) रा. जांब यांनी फिर्याद दिली की, ६ फेब्रुवारी रोजी आरोपी विष्णू अव्हाळे, शिवा मुठाळ, बबलू अव्हाळे, हरीष मुठाळ, डिगांबर अव्हाळे यांनी संगनमत करून जागेच्या वादातून फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकास शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, १४७, १४८, १४९, ४५२, ५०४, ५०६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एपीआय निलेश शेंम्बडे करीत आहेत.
जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 2:11 PM