शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

क्रिकेट खेळताना चिडवल्यावरून भाईंदरमध्ये राडा; अल्पवयीन मुलाला चावून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 12:20 PM

७ जणांवर गुन्हा दाखल

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क भागात क्रिकेट खेळताना चिडवल्यावरून एका कुटुंबातील लोकांनी साथीदारांसह दुसऱ्या कुटुंबास मारहाण - शिवीगाळ करत अल्पवयीन मुलास चावून जखमी केल्या प्रकरणी ७ जणांवर नवघर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१४ जून रोजी दाखल सदर गुन्ह्यातील फिर्यादी भावना तिवाडी ह्या एका संस्थेच्या अध्यक्ष असून कुटुंबासह जेसलपार्कच्या स्वागतम कॉम्प्लेक्स मध्ये राहतात . त्यांचा १५ वर्षीय मुलगा सुजित हा इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळत असताना तेथे खेळणाऱ्या निरंक राठोड ह्या मुलास चिडवले . त्या वरून निरंकचे काका भावना यांच्या घरी जाऊन सासू कडे सुजीतची तक्रार केली . नंतर सुजित इमारत आवारात खाली बसला असल्याचे पाहून त्याला शिवीगाळ केली.

सुजितला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी वडील मनीष हे सुजित व देव ह्या मुलांना घेऊन निरंकच्या घरी गेले असता त्याची आत्या समीक्षा व त्यांच्यात वाद सुरु झाला . निरंकाचे आजोबा सतेंद्रसिंग राठोड यांनी देवचा हात पिरगळला तर समीक्षा हिने सुजितच्या हातावर कडकडीत चावून रक्तबंबाळ केले . नंतर आणखी ४ ते ५ जणांनी देव ह्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली .  या प्रकरणी सतेंद्रसिंग राठोड, समीक्षा राठोड , निरंक चे काका व अन्य ४ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करून नवघर पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस