नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेकजण काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी तिला इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. बडू गावात ही हैराण करणारी घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना घरच्यांनी दिली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. प्रेमाला विरोध झाल्यानंतर विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा इंग्रजीचा शिक्षक यांचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची माहिती मिळाली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा अनेकदा सल्ला दिला होता. मात्र या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्या. त्यानै एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदारानं ते द्यायला नकार दिला. अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले.
कुटुंबीयांना हे दोघं कुठे गेले आहेत याबाबत काहीच माहिती नाही. तसेच घरातील काही सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आणि शिक्षक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट
विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर (72 वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत एक योजना आखली.