मुंबई - संबंध महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अहमदनगरमधील कोपर्डी येथील अल्वपवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी आता २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दोषींच्या विनंतीनंतर खटला औरंगाबाद ऐवजी मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.
कोपर्डी निकालाने ‘ती’ समाधानी!
कोपर्डी अत्याचार व हत्याकांड प्रकरणातील तीनही नराधमांना अहमदनगर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर या फाशीच्या शिक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाकडे दाखल पुष्टी (कन्फर्मेशन) याचिकेवर सुनावणी होऊन खटला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता.
कोपर्डी खटला आता औरंगाबादहून मुंबई उच्च न्यायालयात
१६ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली होती. आता मुंबई उच्च न्यायालयात या बहुप्रतिक्षित खटल्यावर लवकरात लवकर म्हणजे २५ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी घेऊन दोषींच्या दाखल याचिकेवर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीडिता कुटुंबीयांच्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव काम पाहत आहेत.
कोपर्डी खटल्यात खंडपीठात बाजू मांडण्यासाठी उमेशचन्द्र यादव यांची नियुक्ती