शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अखेर स्कुटीवरील 'लव्ह बर्ड'वर गुन्हा दाखल, कायद्यानुसार 'ही' होईल शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 8:33 PM

लखनौतील गर्दी असलेल्या रस्त्यावर तरुण स्कूटी चालवत आहे आणि तरुणी त्याच्या समोर बसली आहे, ती तरुणी त्या तरुणाला किस करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

लखनौ - सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण-तरुणीचा बाईकवरतीच रोमान्स सुरू असल्याचा दिसत आहे. हा व्हिडीओ लखनौमधील हतरजगंजच्या पॉश मार्केटमधील आहे, पॉश मार्केटमधील रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसत आहे. या गर्दीतच स्कुटीवर तरुण-तरुणी रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या २७९ आणि २९४ नुसार कारवाई करण्यात येईल. दरम्यान, हा जामीनपात्र गुन्हा आहे. 

लखनौतील गर्दी असलेल्या रस्त्यावर तरुण स्कूटी चालवत आहे आणि तरुणी त्याच्या समोर बसली आहे, ती तरुणी त्या तरुणाला किस करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यानंतर, आयपीसीच्या २७९ व २९४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

आयपीसी २७९ भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी २७९ नुसार इतरांना चिडवण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक रस्ते मार्गावर जलदगतीने किंवा बेजबाबदारीने वाहन चालवल्यास, त्याला आरोपी मानण्यात येते. या चालकाकडून मनुष्याला संकट किंवा जखम होईल, असे या कृत्यास ग्राह्य धरले जाते. त्यानुसार, एका विशिष्ट काळासाठी तुरुंगवास, तो सहा महिने वाढवलाही जाऊ शकतो. त्यासोबतच, १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा देण्याचीही तरतूद कायद्यात आहे. दरम्यान, हा जामीनपात्र गुन्हा आहे. 

आयपीसी २९४दुसऱ्यांना चिडविण्याच्या उद्देशाने कोणीही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कार्य केल्यास, अश्लील गाणं, व्हिडिओ किंवा तसे कृत्य केल्यास २९४ नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र, कायद्यात अश्लील या शब्दात विस्तृत अर्थ देण्यात आला नाही. पण, सार्वजनिक ठिकाणी चुंबन, अलिंगन किंवा रोमान्स करत असल्यास त्यास अश्लील मानले जाते. या गुन्ह्यात एका विशिष्ट काळासाठी तुरुंगवास होऊ शकतो. तो तीन महिने वाढवलाही जाऊ शकतो. तसेच, आर्थिक स्वरुपातही दंड देण्यात येऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षेची तरतूद कायद्यानुसार आहे.  

नेटीझन्सच्या मागणीनंतर गुन्हा

दरम्यान, नेटकऱ्यांनी या तरुण-तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच, पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. दरम्यान, अशाच प्रकार एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी सोशल माीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ आंध्रप्रदेशमधील होता. या तरुणाविरोधातही पोलिसांनी कारवाई केली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल