कल्याण - एका बँकेत लुटीच्या उद्देशाने आलेल्या मुकेश मेमन याने एका पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला होता. याला अँटी रॉबरी स्कॉडने अटक केली आहे. चार राज्याचे पोलीस पथक मुकेशच्या शोधात होती. त्याचा साथीदार दत्ता शिंदे याचा शोध सुरू आहे.
30 ऑगस्ट रोजी स्कॉडच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की, पश्चिम संतोषी माता रोड येथील एका बँकेत चोरटे येणार आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला .चोरटे आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी अमोल गोरे याच्या अंगावर गाडी घालून दोघे चोरटे पसार झाले. मुकेश मेमन आणि दत्ता शिंदे या दोघांच्या शोधत पोलीस होते. अखेर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून पळणाऱ्या चोरट्या मेमनला अटक केली. मेमन आणि त्याचा साथीदार दत्ता हे दोघे बँकेबाहेर उभे राहून बतावणी करत बँकेत येणाऱ्या नागरिकांना लुटत होते.
मेमन यांच्याविरोधात देशभरात तब्बल 100 गुन्हे दाखल आहेत. 30 गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. चार राज्याची पोलीस मुकेशच्या शोधात होती. हेअरस्टाईल आणि मिशाची स्टाईल बदलून तो आपली ओळख लपवून वावरत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली.