शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

अखेर आसिफ खान यांचा मृतदेह गवसला; आठ दिवसांच्या परिश्रमानंतर पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:48 PM

अखेर आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना आसिफ खान यांचा मृतदेह वडद-ब्रह्मपुरी गावाजवळील नदी पात्रात वाहून जाताना गवसला.

ठळक मुद्दे हा मृतदेह आसिफ खान यांचाच असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

अकोला: भूखंडाच्या आर्थिक वादातून वाशिम जिल्हा परिषदेची महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे हिने वाडेगावचे माजी सरपंच आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घुण हत्या करून त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पुलावरून पूर्णा नदीच्या पात्रात फेकला होता; परंतु मृतदेह मिळत नव्हता. अखेर आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना आसिफ खान यांचा मृतदेह वडद-ब्रह्मपुरी गावाजवळील नदी पात्रात वाहून जाताना गवसला. हा मृतदेह आसिफ खान यांचाच असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली.भारिप बमसंचे नेते आसिफ खान व वाशिम जि.प.चे विद्यमान महिला बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांच्यात भूखंडाचा आर्थिक वाद सुरू होता. १६ आॅगस्ट रोजी रात्री ज्योती गणेशपुरे हिने आसिफ खान यांना दर्यापूर तालुक्यातील आमला येरंडी येथील बहिणीच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे आसिफ खान तेथे गेले. या ठिकाणी ज्योती गणेशपुरेसह तिचा मुलगा वैभव गणेशपुरे, स्वप्निल ऊर्फ गोलू वानखडे, वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले आणि अशोक श्रावण साबनकर यांनी आसिफ खान यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी आसिफ खान यांचा मृतदेह एका जीपमध्ये टाकला आणि सोबत त्यांची कारसुद्धा घेतली. म्हैसांग पुलावर आल्यावर आरोपींनी मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी ज्योती गणेशपुरेसह वैभव गणेशपुरे, स्वप्नील वानखडे यांना २१ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर २२ आॅगस्ट रोजी वारीस शेख हुसेन, रामदास आत्माराम पखाले व अशोक श्रावण साबनकर या तिघांना अटक केली. सर्वच आरोपी २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम राबविली; परंतु मृतदेह गवसत नव्हता. अखेर आठ दिवसांच्या प्रयत्नांनंतर आसिफ खान यांचा मृतदेह वडद गावाजवळील नदी पात्रात दिसून आला. दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह आसिफ खान यांचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आसिफ खान यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होतील.

पोहणाऱ्या युवकांना दिसला मृतदेहवडद-ब्रह्मपुरी परिसरातील काही युवक पूर्णा नदीत दुपारी पोहत असताना, त्यांना एक मृतदेह वाहत असल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती सांगितली. वडद व ब्रह्मपुरी येथील पोलीस पाटलांनीसुद्धा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाMurderखून